Anuradha Vipat
२०२६ वर्षाचे स्वागत करण्यासाठी तुम्ही नेहमीच्या पार्ट्यांपेक्षा काही अनोख्या आणि हटके पद्धती वापरू शकता.
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला रात्री ८ ते १२ या वेळेत कुटुंबातील सर्वांचे फोन बंद ठेवा.
एकमेकांशी मनसोक्त गप्पा मारा, जुन्या फोटोंचे अल्बम पहा आणि जुन्या आठवणींना उजाळा द्या.
शहरातील गर्दीपासून दूर एखाद्या मोकळ्या जागी किंवा टेकडीवर जा आणि सुखद अनुभव ठरू शकतो.
मित्रांना किंवा कुटुंबाला एकत्र बोलवा. प्रत्येकाने २०२६ मध्ये आपल्याला काय साध्य करायचे आहे, त्याची चित्रे किंवा वाक्ये एका बोर्डवर लिहा.
गेल्या वर्षात तुमच्यासोबत घडलेल्या चांगल्या गोष्टी चिठ्ठ्यांवर लिहा. यामुळे नवीन वर्षाची सुरुवात सकारात्मक विचारांनी होईल.
घरात एक छोटे रोप किंवा झाड लावा. वर्षभर त्या झाडाची काळजी घेताना तुम्हाला तुमच्या संकल्पाची आठवण होत राहील.