Anuradha Vipat
आचार्य चाणक्यांनी त्यांच्या नीतिशास्त्रामध्ये अशा काही व्यक्तींच्या प्रकारांचे वर्णन केले आहे, ज्या कधीही सुखी राहू शकत नाही
ज्याला कितीही मिळाले तरी समाधान वाटत नाही, अशी व्यक्ती नेहमी असमाधानी आणि दुःखी असते.
जो स्वतःच्या प्रगतीपेक्षा दुसऱ्याच्या सुखाकडे बघून जळतो, तो मानसिकरीत्या कधीही सुखी नसतो.
जी व्यक्ती प्रत्येक नात्यात आणि कामात शंका घेते, तिला कधीही मानसिक शांतता मिळत नाही.
अति रागामुळे ही व्यक्ती स्वतःचेच नुकसान करून घेते आणि जवळची माणसे गमावते.
जी व्यक्ती स्वतःच्या कष्टापेक्षा नशिबावर किंवा दुसऱ्याच्या मदतीवर अवलंबून असते, तिला कधीही स्वाभिमानाचे सुख मिळत नाही.
जी व्यक्ती चुकीच्या मार्गाने धन कमवते, तिचे सुख क्षणभंगुर असते आणि शेवटी तिला पश्चात्ताप करावा लागतो.