Chakli Bhajani Recipe : चकलीची खमंग भाजणी: १ किलोचे अचूक वजनी आणि वाटीचे प्रमाण; चकली कधीच मऊ पडणार नाही!

Anuradha Vipat

भाजणी

दिवाळीच्या फराळात खमंग, काटेरी आणि तोंडात टाकताच विरघळणारी चकली बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे 'भाजणी'.

Chakli Bhajani Recipe | agrowon

चकली

भाजणी योग्य झाली तरच चकली न तुटता छान हलकी आणि कुरकुरीत होते.

Chakli Bhajani Recipe | agrowon

वजनी आणि घरगुती वाटी

येथे १ किलोच्या अचूक वजनी आणि घरगुती वाटीच्या प्रमाणात चकलीची पारंपरिक भाजणी कशी करायची, याची सविस्तर रेसिपी पाहूयात.

Chakli Bhajani Recipe

अचूक प्रमाण

तांदूळ- (जुना कोलम किंवा रेशनचा)५०० ग्रॅम ४ वाट्या

हरभरा डाळ - २५० ग्रॅम २ वाट्या

उडीद डाळ- १२५ ग्रॅम १ वाटी

मूंग डाळ- ६० ग्रॅम १/२ वाटी

पोहे -५० ग्रॅम १/२ वाटी

साबुदाणा- ३० ग्रॅम१ /४ वाटी

धने- ३० ग्रॅम १/४ वाटी

जिरे- १५ ग्रॅम २ मोठे चमचे

Chakli Bhajani Recipe | agrowon

कृती

तांदूळ, हरभरा डाळ, उडीद डाळ आणि मूंग डाळ वेगवेगळ्या स्वच्छ पाण्याने २ ते ३ वेळा धुवून घ्या. धुतल्यानंतर सर्व जिन्नस सुती कपड्यावर घरातच सावलीत सुकवून घ्या.

Chakli Bhajani Recipe | agrowon

जिन्नस खमंग भाजणे

सर्व जिन्नस जाड बुडाच्या कढईत स्वतंत्रपणे आणि मंद आचेवर भाजायचे आहेत

Chakli Bhajani Recipe | agrowon

दळणे

भाजलेले सर्व जिन्नस एका मोठ्या परातीत किंवा ताटात एकत्र करून पूर्णपणे थंड होऊ द्या. थंड झाल्यावर हे मिश्रण गिरणीतून 'चना डाळीच्या' चाळणीवर अगदी बारीक दळवून आणा.

Chakli Bhajani Recipe | agrowon

Crispy Karanji Recipe : तोंडात टाकताच विरघळणारी खुसखुशीत करंजी: पारंपरिक सुके सारण बनवण्याची सुटसुटीत पद्धत

Crispy Karanji Recipe | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...