Vermicompost : ‘शेतकरी मित्र’गांडूळ!; गांडूळ खत किंवा वर्मिकंपोस्ट खताचे शेतीसाठी फायदे

Aslam Abdul Shanedivan

‘शेतकरी मित्र’

ओलावा असणाऱ्या जमिनीत आणि शेतात आपल्या गांडूळ दिसतो. त्याच गांडूळाला ‘शेतकरी मित्र’ असे म्हटले जाते.

Vermicompost | Agrowon

गांडूळ खत किंवा वर्मिकंपोस्ट

गांडूळ जमिनीत आढळणारे सेंद्रिय पदार्थ खातो. ते खाल्ल्यानंतर जी विष्टा बाहेर टाकतो. त्यालाच गांडूळ खत किंवा वर्मिकंपोस्ट खत असे म्हणतात. या क्रियेला चोवीस तासांचा कालावधी लागतो.

Vermicompost | Agrowon

वनस्पतीच्या वाढीस मदत

गांडूळखतात वनस्पतीच्या वाढीस लागणारी अन्नद्रव्ये, संप्रेरके, उपयुक्त जीवाणू असतात. हे वनस्पतीत रोग प्रतिकारक क्षमता वाढवतात.

Vermicompost | Agrowon

एक महत्वाचा घटक

गांडूळखत अन्नद्रव्ये, संप्रेरकाने भरपूर असे दाणेदार सेंद्रीय खत असते. जे जैविक गुणधर्म वाढविते. गांडूळखत हा सेंद्रीय शेतातील एक महत्वाचा घटक आहे.

Vermicompost | Agrowon

जमीन भुसभुशीत

गांडूळ खतामुळे जमीन भुसभुशीत राहते, त्यामुळे जमिनीत हवा व पाणी खेळते राहते व पिकांची वाढ अधिक वेगाने होते.

Vermicompost | Agrowon

पाण्याचा योग्य निचरा

गांडूळ खतामुळे पाण्याचा योग्य निचरा होतो व जमिनीची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता वाढते. पाणी साठवून ठेवण्याची क्षमता वाढल्याने बागायती पिकांबाबत सिंचनाचा खर्च कमी होतो व पाण्याची बचत होते.

Vermicompost | Agrowon

कचऱ्यापासून निर्मिती

गांडूळ खताची निर्माण कचऱ्यापासूनही करता येते. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी गांडूळ खत निर्माण करायला हवे. यामुळे उत्पादन खर्चात घट होऊन नफा मिळण्यास मदत होते.

Vermicompost | Agrowon

Silk Making Process : रेशीम कीडा ते धागा बनण्याची कशी असते प्रक्रिया?

आणखी पाहा