Anuradha Vipat
पोट फुगणे होणे ही पचनसंस्थेशी संबंधित एक सामान्य पण त्रासदायक समस्या आहे.
अन्न व्यवस्थित न शिजणे किंवा घाईघाईत जेवणे यामुळे हवा पोटात जाते. तसेच पोट साफ न झाल्यामुळे आतड्यांमध्ये गॅस अडकून राहतो.
जास्त तळलेले, मसालेदार पदार्थ किंवा कोबी, फ्लॉवर, कडधान्ये खाल्ल्याने गॅस होतो. शरीरात पाणी कमी असल्यास पचन मंदावते.
कोमट पाण्यासोबत अर्धा चमचा ओवा आणि थोडे काळे मीठ घेतल्यास त्वरित आराम मिळतो.
आले पचन सुधारते आणि पोटातील गॅस बाहेर काढण्यास मदत करते.
केळी, पपई आणि पालेभाज्यांचा समावेश करा. जेवणानंतर जिरे पूड टाकलेले ताक प्यायल्याने पचन सुलभ होते.
जेवणात किंवा कोमट पाण्यात चिमूटभर हिंग टाकून घेतल्याने गॅस कमी होतो.