Anuradha Vipat
उन्हाळ्यात वातावरणातील उष्णता वाढल्यामुळे शरीरातील 'पित्त दोष' नैसर्गिकरित्या वाढतो.
पित्त दोषामुळे छातीत जळजळ, ॲसिडिटी, डोकेदुखी, अंगावर पुरळ उठणे आणि अपचनाचा त्रास होतो.
दुपारच्या जेवणानंतर जिरेपूड आणि कोथिंबीर टाकलेले ताक प्यायल्याने पोटात त्वरित थंडावा मिळतो.
कोकम नैसर्गिकरित्या पित्तनाशक असून शरीराला थंड ठेवते.
१ चमचा धणे आणि १ चमचा जिरे रात्री पाण्यात भिजवून सकाळी ते पाणी गाळून प्यावे.
आहारात ज्युस, काकडी, टरबूज, आणि दुधी भोपळा यांसारख्या पाण्याचे प्रमाण जास्त असलेल्या पदार्थांचा समावेश करा.
रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी पिल्याने पित्त तीव्र गतीने वाढते.