Anuradha Vipat
उन्हाळ्यात उष्णता, कोरडी हवा आणि एसीचा अतिवापर यामुळे डोळ्यांतील ओलावा कमी होतो, ज्याला 'ड्राय आय' समस्या म्हणतात.
प्रखर उष्णतेमुळे डोळ्यांतील नैसर्गिक अश्रूंचे बाष्पीभवन वेगाने होते.
ऑफिस किंवा घरातील एसीमधील कोरडी हवा डोळ्यांना कोरडे करते.
दिवसातून ३-४ वेळा गार पाण्याने डोळे हलक्या हाताने धुवा. यामुळे डोळ्यांना थंडावा मिळतो.
बाहेर पडताना दर्जेदार सनग्लासेस लावा, ज्यामुळे गरम वारा आणि अतिनील किरणांपासून संरक्षण होईल.
शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य असल्यास डोळ्यांचा ओलावा टिकून राहतो.
डोळ्यांवर काकडीचे काप किंवा थंड पाण्याचे कोम ठेवल्याने आराम मिळतो.