Summer Health : अति उष्णतेमुळे होणाऱ्या अतिसार अन् डिहायड्रेशनची लक्षणं आणि उपाय

Mahesh Gaikwad

मॉन्सून सरी

देशभरात काही दिवसातंच मॉन्सून सरींचे आगमन होणार आहे. परंतु अजूनही देशातील विविध भागात सुर्य आग ओकत आहे.

Summer Health | Agrowon

तापमानाचा पारा

उत्तर भारतासह अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ४५ अंशाच्या पार गेल्याने उन्हाच्या झळा असह्य झाल्या आहेत.

Summer Health | Agrowon

अति उष्णता

अशातच अति उष्णतेमुळे डिहायड्रेशन आणि अतिसाराचा त्रास अनेकांना होत आहे.

Summer Health | Agrowon

अतिसार

उन्हाळ्यात तुम्हालाही अतिसाराचा त्रास होण्याची शक्यता असेल अथवा झाला असेल, तर त्याआधी त्याची लक्षणे दिसून येतील.

Summer Health | Agrowon

जुलाब

जुलाब होणे, मळमळ होणे किंवा शरीरातील पाणी कमी होणे म्हणजेच डिहायड्रेशन अशी लक्षणे दिसू लागतील.

Summer Health | Agrowon

पोटात वेदना

तसेच पोटामध्ये गंभीर वेदना होणे आणि ताप येण्यासारखी लक्षणेही दिसू लागतील. अशी लक्षणे दिसायला लागताच त्वरित उपचार करा.

Summer Health | Agrowon

मसालेदार पदार्थ

अशा परिस्थितीत मसालेदार अन्न, दुग्धजन्य पदार्थ खाणे टाळावे. तसेच कॅफिन आणि अल्कोहोल घेणेही टाळले पाहिजे.

Summer Health | Agrowon

साधा आहार

आहारामध्ये डाळीची खिचडी किंवा अगदी साधा आहार घ्यावा. तसेच जास्तीत जास्त पाणी प्यावे.

Summer Health | Agrowon