Anuradha Vipat
तोंडाची दुर्गंधी केवळ सामाजिक संकोचाचे कारण ठरत नाही, तर ती तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींशीही संबंधित असते.
काही ठराविक पदार्थांमुळे तोंडात बॅक्टेरिया वाढतात किंवा त्यांचे उग्र वास श्वासावाटे बाहेर पडतात.
लसूण किंवा कांदा खाल्ल्यानंतर ते रक्ताभिसरणात शोषले जातात आणि फुफ्फुसांद्वारे श्वासावाटे बाहेर पडतात.
कॉफीमधील कॅफिनमुळे लाळेचे प्रमाण कमी होते आणि तोंड कोरडे पडते. ज्याला 'कॉफी ब्रीथ' असेही म्हटले जाते.
चॉकलेट किंवा गोड पदार्थ खाल्ल्यानंतर बॅक्टेरिया त्याचे विघटन करतात, ज्यामुळे तोंडातून आम्लयुक्त दुर्गंधी येते.
मद्यामुळे तोंड पूर्णपणे कोरडे पडते . लाळ कमी झाल्यामुळे नैसर्गिकरित्या तोंड साफ होत नाही आणि दुर्गंधी वाढते.
दूध किंवा चीजमधील प्रथिने तोंडातील बॅक्टेरिया सहजपणे पचवतात. ज्यामुळे श्वासाला कुबट वास येतो.