Eye Health : डोळ्यातून चिपडे आणि पाणी का येतं? जाणून घ्या कारणे आणि उपाय

Mahesh Gaikwad

डोळ्यातून पाणी येणे

बऱ्याच लोकांना सकाळी झोपेतून उठल्यानंतर डोळ्यातून पाणी येणे किंवा डोळे चिपडण्याची समस्या होते. सकाळी झोपेतून उठल्यानंतर डोळे चिपडणे ही तशी सामान्य समस्या आहे.

Eye Health | Agrowon

गंभीर आजार

परंतु असे असले, तरी डोळ्यांशी संबंधित समस्यांकडे दुर्लक्ष केले नाही पाहिजे. कारण कधीकधी छोटी वाटणारी समस्या डोळ्याच्या गंभीर आजाराचे कारण बनू शकते.

Eye Health | Agrowon

डोळे चिपडणे

प्रत्येक व्यक्तीचे डोळे चिपडतात. पंरतु डोळे जास्त प्रमाणात चिपडत असतील किंवा जास्त पाणी येत असेल, तर ही सामान्य बाब नाही.

Eye Health | Agrowon

डोळ्याच्या समस्या

आज आपण डोळे का चिपडतात? आणि डोळ्यातून चिकट पाणी का येते? याची कारणे आणि त्यावरील उपायांची माहिती आज आपण पाहणार आहोत.

Eye Health | Agrowon

श्लेष्मा

तज्ज्ञांच्या मते, डोळ्यांमध्ये सतत एक तरल पदार्थ तयार होत असतो, ज्याला म्युकस म्हणजेच श्लेष्मा असे म्हणतात. या म्युकसमुळे डोळ्यातील धूळ, घाण बाहेर काढण्यास मदत होते.

Eye Health | Agrowon

डोळ्यात चिकटपणा

रात्री आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपले डोळे बंद असतात. त्यावेळी हा म्युकस जमा होत राहतो आणि सुकतो. परिणामी सकाळी झोपेतून उठल्यावर डोळ्यांच्या पापण्यांवर किंवा कडेला चिकटपण जाणवतो.

Eye Health | Agrowon

पाणी येणे

आरोग्याच्या काही समस्यांमुळेही डोळ्यातून चिपडे आणि पाणी येते. कोरडे डोळे, डोळ्यांचे संक्रमण, पापण्यांच्या कडा सुजणे या अशा कारणांमुळे डोळ्यातून जास्त पाणी किंवा चिपडे येतात.

Eye Health | Agrowon

स्पर्श टाळा

जर तुमचे डोळ्यातून जास्त चिपडे येत असतील, तर डोळ्यांना सतत हात लावण्याचे टाळा. झोपण्यापूर्वी कॉन्टॅक्ट लेन्स आणि डोळ्यांचा मेकअप काढून टाका.

Eye Health | Agrowon

डॉक्टरांचा सल्ला

जर डोळ्यातून खूप प्रमाणात चिपडे आणि पाणी येत असेल, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेवून उपचार घ्या. ही माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे.

Eye Health | Agrowon
Eye Health | Agrowon