Anuradha Vipat
मेंदू हे आपल्या शरीराचं नियंत्रण केंद्र आहे.
शरीराच्या प्रत्येक हालचालीसाठी मेंदू आदेश पाठवतो आणि प्रत्येक क्रिया त्याच्या नियंत्रणात असते.
मेंदूच्या नसांमध्ये ब्लॉकेज निर्माण झाल्यास, ऑक्सिजन आणि आवश्यक पोषक तत्त्वं मेंदूपर्यंत पोहोचत नाहीत.
यामुळे मेंदूचं कार्य थांबण्याची शक्यता असते आणि स्ट्रोक होण्याचा धोका निर्माण होतो
रक्ताच्या गुठळ्या मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांना ब्लॉक करू शकतात.
हृदयविकार असलेल्या लोकांसाठी स्ट्रोकचा धोका वाढतो आणि त्यामुळे मेंदूतील नस ब्लॉक होऊ शकते.
धूम्रपानामुळे रक्तवाहिन्यांना नुकसान होतं आणि त्यामुळे स्ट्रोकचा धोका वाढतो.