Anuradha Vipat
घरच्या घरी फुलकोबी स्वच्छ करण्याच्या काही प्रभावी आणि सोप्या पद्धती खालीलप्रमाणे आहेत
फुलकोबीमध्ये कधीकधी लहान कीटक, अळ्या किंवा धूळ असू शकते जे आरोग्यासाठी फार घातक आहे.
एका मोठ्या भांड्यात पुरेसे गरम पाणी घ्या त्यात एक ते दोन चमचे मीठ घाला आणि फुलकोबीचे तुरे या पाण्यात १० ते १५ मिनिटे बुडवून ठेवा.
फुलकोबीचे तुरे वेगळे करा. गरम पाणी घेऊन त्यात अर्धा चमचा हळद पावडर मिसळा. तुरे हळदीच्या पाण्यात १० ते १५ मिनिटे भिजवा.
व्हिनेगरमधील आम्ल जंतुनाशक म्हणून काम करते. पाणी घ्या आणि त्यात २ ते ३ चमचे व्हिनेगर मिसळा.फुलकोबीचे तुरे या व्हिनेगरच्या पाण्यात १५ ते २० मिनिटे भिजवा.
फुलकोबीचे तुरे वेगळे करा. वाहत्या नळाखाली प्रत्येक तुरे नीट घासून स्वच्छ धुवा
फुलकोबी ही एक बहुपयोगी आणि आरोग्यदायी भाजी आहे जी वेगवेगळ्या प्रकारे आपल्या आहारात समाविष्ट केली जाते.