Anuradha Vipat
फ्लॉवर ही केवळ एक चवदार भाजी नसून ती शरीराला अनेक गंभीर आजारांपासून वाचवणारी भाजी आहे.
फ्लॉवरमध्ये कॅलरीज अतिशय कमी आणि फायबर, व्हिटॅमिन्स तसेच अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात.
फ्लॉवरमध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप कमी आणि पाण्याचे प्रमाण जास्त असते. तसेच यात भरपूर फायबर असल्याने ते खाल्ल्यानंतर पोट दीर्घकाळ भरलेले राहते.
फ्लॉवरमधील उच्च फायबर पोटातील चांगल्या बॅक्टेरियांचे पोषण करते. यामुळे बद्धकोष्ठता दूर होते आणि पचनसंस्था निरोगी राहते.
फ्लॉवरमध्ये 'व्हिटॅमिन-सी'भरपूर प्रमाणात असते. हे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करून संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण करते.
यामध्ये असणारे 'सल्फोराफेन' आणि अँटी-ऑक्सिडंट्स रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास आणि रक्तवाहिन्या निरोगी ठेवण्यास मदत करतात.
फ्लॉवरमध्ये असणारे ग्लुकोसिनोलेट्स शरीरातील पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात आणि कॅन्सरचा धोका कमी करण्यास मदत करतात.