Deepak Bhandigare
पचनाशी संबंधित समस्या असेल तर तुम्ही तुमच्या आहारात फुलकोबीचा समावेश करा, कारण त्यात फायबरचे प्रमाण भरपूर असते, जे पचनसंस्थेला निरोगी ठेवण्यास मदत करते
फुलकोबीत सल्फोराफेन नावाचे महत्त्वाचे संयुग असते, जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास तसेच हृदयरोगाचा धोका कमी करण्यास मदत करू शकते
फुलकोबीमध्ये कॅलरीज कमी आणि फायबर अधिक असते, यामुळे वजन नियंत्रित ठेवता येते
फुलकोबीमध्ये व्हिटॅमिन के, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांसारखी महत्त्वाची पोषक तत्त्वे असतात, ज्यामुळे हाडे मजबूत राहतात
फुलकोबीमध्ये असलेल्या 'व्हिटॅमिन सी'मुळे त्वचेला नैसर्गिक चमक येण्यास मदत होते
फुलकोबीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, त्यामुळे त्याचा आहारात समावेश केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहू शकते
फुलकोबीच्या पानांमध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते, जे डोळ्यांसाठी फायदेशीर असल्याचे एका संशोधनातून दिसून आले आहे
फुलकोबीच्या अनेक रेसिपी बनवता येतात, सूप, भाजी, पराठा अथवा पुलावमध्ये त्याचा वापर करु शकता