Mahesh Gaikwad
जगभरात भारतीय मसाल्यांना मोठी मागणी आहे. मसाला पीक एक असलेल्या मिरचीचीही परदेशांमध्ये निर्यात होते.
भारतीय मसाल्यांमध्ये मिरचीचे विशेष महत्त्व आहे. झणझणीत जेवणासाठी आपल्याकडे मिरचीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.
आपल्याकडे तिखटपणासाठी लवंगी मिरची प्रसिध्द आहे. पण जगातील सर्वात तिखट मिरची कोणती? हे तुम्हाला माहित आहे का?
कॅरोलिना रीपर ही जगातील सर्वात तिखट मिरची आहे. या मिरचीचे उत्पादन अमेरिकेमध्ये घेतले जाते.
या मिरचीचा तिखटपणा इतका आहे की, याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे.
या आधी हा विश्वविक्रम भारतात पिकवल्या जाणाऱ्या मिरचीच्या नावे होता. जिचे नाव भूत झोलकिया आहे.
कॅरोलिना रीपर या मिरचीमध्ये १५ लाखांहून अधिक स्कोविल हिट युनिट आढळतात.
सामान्य मिरचीमध्ये या युनिटचे प्रमाण कॅरोलिना रीपर मिरचीच्या तुलनेत केवळ ५ हजारच्या आसपास आढळतात.