Aslam Abdul Shanedivan
सध्या उन्हाचा कडाका वाढला असून याचा त्रास माणवाप्रमाणेच पशुधनालाही होत असतो. यामुळे पशुधनाची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते.
तर उन्हाळ्यात चारा-पाण्याची कमतरता भासते. यामुळे पाशुपाकल आपल्या पशुधनाला चारण्यासाठी दूरवर नेतात
पशुधनात गाई, म्हशी, शेळ्या मेंढ्यांचा समावेश असतो. तर उन्हाळ्यात उन्हाच्या दाहकतेमुळे पशुधनाला उष्माघात होण्याची शक्यता असते.
उन्हाळ्यात शेळ्या मेंढ्यांना रोज चरण्यासाठी किमान ८ ते ९ किलोमीटर नेले जाते. यामुळे चालून उष्णतादाह होण्याची शक्यता असते
यामुळे शेळ्यांना चरण्याकरिता सकाळी लवकर किंवा सायंकाळी न्यावे
तसेच काळजीपुर्वक दुपारच्या वेळेत शेळ्यांना चरण्याकरिता नेऊ नये. किंवा मोठ्या झाडाखाली त्यांचा विसावा करावा.
तर शक्यतो घराजवळच शेळ्या, मेंढ्या, गाई, म्हशी यांच्या चराईसाठी जागा तयार करावी. तेथेच चारा आणि पाण्याची सोय करावी.