Aslam Abdul Shanedivan
कार्डिओ व्यायामामुळे हृदय गती वाढते, ज्यामुळे रक्त प्रवाह सुधारतो आणि हृदयाचे स्नायू मजबूत होतात.
कार्डिओ व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो, रक्तदाब कमी होतो आणि कोलेस्टेरॉलची पातळी सुधारते.
निरोगी जीवनासाठी कार्डिओ वर्कआउट करता येतात. यात धावणे, सायकलिंग, पोहणे, दोरी उड्या मारणे हे उत्तम पर्याय आहेत.
नियमित कार्डिओ व्यायामामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते.
याशिवाय, नियमित व्यायामामुळे एंडॉर्फिन नावाचे हार्मोन्स रक्तात सोडले जातात आणि शरीराला दिवसभर ऊर्जा मिळते. या उर्जेमुळे शरीराची ताकद आणि तग धरण्याची क्षमता सुधारते
जास्त ताणामुळे शरीरात कोर्टिसोलची पातळी वाढते, ज्यामुळे वजन वाढू शकते. यामुळे नियमित कार्डिओ व्यायाम केल्यास तणाव नियंत्रित होते
एखाद्याला झोपेची समस्या असल्यास नियमित कार्डिओ व्यायाम करावा. यामुळे तणाव आणि चिंता कमी होऊन कोर्टिसोलची पातळी कमी होऊन चांगील झोप होते. (अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या)