Cardamom Health Benefits : पाचक गुणाची बहुगुणी वेलची

Team Agrowon

वेलची म्हणजेच वेलदोडा. मसाला तसेच मुखशुद्धीकर पावडर तयार करताना हमखास याचा वापर केला जातो.​

Cardamom Health | agrowon

पाचक म्हणून वेलची उत्तम काम करते. अपचनामुळे ढेकर येत असतील तर वेलची चावून खावी किंवा ठेचून पाण्यात घालून काढा करावा. त्यामध्ये साखर घालून सेवन करावे. काढ्याचे सेवन एकदम करू नये. थोडा-थोडा घ्यावा.

Cardamom Health | agrowon

उलट्या होत असतील तर वेलदोडा सोलून त्याच्या साली फक्त घ्याव्यात. साली तव्यावर भाजून घेऊन (काळ्या होईपर्यंत) थंड कराव्यात. त्याची पावडर करून ती मधासह चाटण स्वरूपात दोन ते तीन वेळा घ्यावी.

Cardamom Health | agrowon

वेलची कफ कमी करणारी असल्याने, वेलची पावडर आणि सुंठ पाव चमचा मधासह घेतल्यास कफ कमी होतो.

Eating Cardamom | Agrowon

जास्त तिखट, चमचमीत पदार्थ सेवन केल्यास किंवा कमी प्रमाणात पाणी पिल्यामुळे लघवीला जळजळ होते. अशावेळी वेलची चूर्ण दूध आणि साखरेसह घ्यावे.

Eating Cardamom | Agrowon

अवेळी किंवा उशिरा केलेले जेवण, रात्री जागरण या कारणांनी बऱ्याचदा पोटात गॅसेस होतात. अशावेळी वेलची पावडर आणि हिंग (भाजलेले) लिंबाच्या रसासह घेतल्यास उपयोग होतो.

Cardamom Health Benefits | Agrowon

वेलची स्निग्ध गुणधर्मी असल्याने पौष्टिक औषधांसह वापरली जाते. शतावरी, अश्‍वगंधा, गोखरू, मुसळी, बदाम, वेलची, साखरेसह एकत्र करून तुप किंवा दुधासोबत घेतल्यास उत्तम पौष्टिक म्हणून काम करते.

Cardamom | agrowon

Summer Drinks : उन्हाळ्यात शरिराला थंडावा देण्यासाठी विविध सरबतांचे प्रकार ; ट्राय तर करुन बघा

आणखी पाहा...