Chicken : आता मांसातील टाकाऊ पदार्थांचाही करता येणार वापर?

Team Agrowon

‘भारतातील अनेक राज्यात मांस उत्पादन आणि विक्री अस्वच्छ ठिकाणी होते.

Chicken Rate | Agrowon

इतकेच नाही तर मांसातील टाकाऊ पदार्थांची (वेस्ट) विल्हेवाट देखील योग्यप्रकारे लावली जात नाही. त्यामुळे आरोग्यविषयक समस्या निर्माण होण्याची भीती राहते.

What are the effects of fungal food on chickens? | Agrowon

त्या पार्श्‍वभूमीवर पशूंच्या कत्तलीनंतर निर्माण होणाऱ्या टाकाऊ पदार्थांवर प्रक्रियेचे तंत्रज्ञान राष्ट्रीय मांस संशोधन संस्थेने विकसित केले आहे,’’ अशी माहिती संस्थेचे संचालक डॉ. एस. बी. बारबुध्दे यांनी ‘ॲग्रोवन’ ला दिली.

Chicken | Agrowon

डॉ. बारबुध्दे यांनी दिलेल्या माहितीनुसार मांसावर प्रक्रिया करावयाची असल्यास ‘डेल स्लॉटर हाऊस’चे मॉडेल संस्थेने विकसित केले आहे.

Grampriya Chickens | Agrowon

इतकेच नाही तर संस्थेने मांस उत्पादनातील टाकाऊ पदार्थांवरप्रक्रियेचे तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले आहे. तीन ते चार टन मांस असल्यास त्यातील पाय व इतर काही भाग फेकून देतात.

How to choose broiler chicken chicks | Agrowon

मात्र अशा १०० किलोंच्या टाकाऊ पदार्थांवर प्रक्रिया केल्यास त्यापासून २० किलो पावडर आणि ८ ते १० लिटर तेल मिळते. या पावडरमध्ये ४० टक्‍के प्रोटीन राहते. पाळीव कुत्रे आणि शोभिवंत माशांसाठी त्याचा खाद्य म्हणून उपयोग करता येतो.

Checken | Agrowon