Anuradha Vipat
महिलांच्या आयुष्यात मासिक पाळी, गर्भधारणा, स्तनपान आणि रजोनिवृत्ती या टप्प्यांवर शरीराला कॅल्शियमची सर्वाधिक गरज असते.
शरीरात कॅल्शियम कमी झाल्यास हाडे ठिसूळ होतात आणि ऑस्टिओपोरोसिससारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो.
पुरेशी झोप घेऊनही दिवसभर प्रचंड आळस, थकवा आणि शरीरात ऊर्जा नसणे हे मुख्य लक्षण आहे.
पाय, पाठ आणि कंबरेच्या स्नायूंमध्ये सतत तीव्र वेदना होणे किंवा वारंवार पेटके येणे.
नखे पातळ होऊन सहज तुटणे, नखांवर पांढरे डाग पडणे आणि केस कोरडे होऊन जास्त गळणे
दातांची मुळे कमकुवत होणे, दात लवकर किडणे किंवा हिरड्यांमधून रक्त येणे.
कॅल्शियम अभावी मज्जासंस्थेवर परिणाम झाल्याने हाता-पायांची बोटे सुन्न पडणे किंवा तिथे सुया टोचल्यासारख्या मुंग्या येणे.