Anuradha Vipat
घरी ओव्हन नसेल, तरीही तुम्ही मऊ, लुसलुशीत आणि स्पंजसारखा केक घरच्या कढईमध्ये सहज बनवू शकता.
कढईमध्ये बेकिंग करणे अतिशय सोपे आहे, फक्त काही लहान ट्रिक्स समजून घेणे गरजेचे आहे.
मैदा, पिठीसाखर ,दही , रिफाइंड तेल (वास नसलेले) किंवा बटर, दूध, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा , व्हॅनिला एसेन्स ,मीठ.
कढईच्या तळाशी १ कप साधे मीठ किंवा वाळू पसरा मीठावर एक लोखंडी स्टँड किंवा उलटी वाटी ठेवा. आता कढईवर घट्ट झाकण ठेवून मंद ते मध्यम आचेवर १० मिनिटे कढई गरम होऊ द्या.
केक भांड्याला थोडे तेल किंवा बटर लावा. त्यावर थोडा सुका मैदा भुरभुरा. मोठ्या भांड्यात अर्धा कप दही आणि १ कप पिठीसाखर एकत्र घेऊन चमच्याने किंवा विस्करने साखर विरघळेपर्यंत छान फेटून घ्या. आता त्यात अर्धा कप तेल आणि १ छोटा चमचा व्हॅनिला एसेन्स टाकून सर्व मिश्रण एकजीव करा.
दही-साखरेच्या मिश्रणावर एक चाळणी ठेवा. त्यात मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि चिमूटभर मीठ टाकून ते थेट त्या भांड्यात चाळून घ्या. आता हे मिश्रण 'कट अँड फोल्ड' पद्धतीने एकाच दिशेने हलक्या हाताने मिक्स करा. त्यात थोडे थोडे करून अर्धा कप दूध मिक्स करा आणि बॅटर तयार करा.
बॅटर केकच्या भांड्यात ओता. कढईवर हवा बाहेर जाणार नाही असे घट्ट झाकण ठेवा. मंद आचेवर केक ३५ ते ४० मिनिटे बेक होऊ द्या.