Anuradha Vipat
शरीराचा वास येणे ही केवळ एक नैसर्गिक प्रक्रिया नसून ती तुमच्या रोजच्या सवयींशी संबंधित असते.
घाम स्वतः गंधहीन असतो परंतु जेव्हा तो त्वचेवरील बॅक्टेरियाच्या संपर्कात येतो तेव्हा दुर्गंधी निर्माण होते.
रोज अंघोळ न करणे किंवा घामाने ओले झालेले कपडे पुन्हा वापरणे यामुळे बॅक्टेरियांची वाढ होते, परिणामी शरीराला दुर्गंधी येते .
जास्त प्रमाणात कांदा, लसूण, तिखट मसाले आणि कॅफिन यांचे सेवन केल्यास घामाला उग्र वास येतो.
नायलॉन किंवा पॉलिस्टरसारखे कपडे घाम शोषून घेत नाहीत. यामुळे घाम त्वचेवर साचून राहतो आणि दुर्गंधी निर्माण होते.
कमी पाणी प्यायल्याने लघवी आणि घाम जास्त केंद्रित होतो, ज्यामुळे शरीराचा वास उग्र होऊ शकतो.
जेव्हा आपण तणावाखाली असतोतेव्हा शरीरातील 'एपॉक्राइन' ग्रंथी अधिक सक्रिय होतात. या ग्रंथींतून निघणारा घाम जास्त जाड असतो.