Anuradha Vipat
धनतेरसला झाडू खरेदी केल्याने घरामध्ये वर्षभर बरकत राहते.
धनत्रयोदशीला झाडू का खरेदी करावा, त्याचे धार्मिक महत्त्व आणि लक्ष्मी प्राप्तीचे खास नियम खालीलप्रमाणे आहेत.
मत्स्य पुराणात झाडूला माता लक्ष्मीचे रूप मानले गेले आहे. झाडू घरातून कचरा आणि अस्वच्छता दूर करतो.
धनत्रयोदशीला नवीन झाडू घरात आणल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा, दारिद्र्य आणि 'अलक्ष्मी' घराबाहेर पडते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
या दिवशी नवीन झाडू आणून जुन्या झाडूची योग्य विधीनुसार विल्हेवाट लावल्याने जुनी कर्जे आणि पैशांची चणचण दूर होण्यास मदत होते.
धनत्रयोदशीला नेहमी विषम संख्येत म्हणजे ३ झाडू खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते.
धनतेरसच्या दिवशी खरेदी केलेल्या ३ झाडूंपैकी एक झाडू दुसऱ्या दिवशी पहाटे उठून एखाद्या मंदिरात गुपचूप दान करावा. असे केल्याने अचानक धनलाभ होतो आणि रखडलेली कामे मार्गी लागतात.