Deepak Bhandigare
ताक हे अत्यंत पौष्टिक आणि आरोग्यदायी पेय असून ते उन्हाळ्यात उष्णतेपासून दिलासा देण्यास मदत करु शकते
तुम्ही दिवसा कोणत्याही वेळी ताक पिऊ शकता, मात्र, ते जेवणानंतर पिणे चांगले मानले जाते, त्याचा एक ग्लास आरोग्यासाठी फायदेशीर आहे
संध्याकाळी अथवा रात्री ताक पिणे टाळावे, कारण रात्री ताक प्यायल्याने पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात
ताक हे इलेक्ट्रोलाइट म्हणून काम करते, ते तुम्हाला एनर्जी देते. पोटात जळजळ होत असल्यास त्यावर उपाय म्हणून तुम्ही ताक पिऊ शकता
जर तुम्ही दररोज दुपारी काळे मीठ घालून ताक प्यायलात, तर अन्न लवकर पचण्यास मदत होऊ शकते, यामुळे बद्धकोष्ठतेची समस्यादेखील दूर होते
ताकामध्ये असलेले पोटॅशियम आणि मॅग्नेशियम रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते, त्याचे नियमित सेवन केल्यास हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते, असे काही संशोधनात आढळून आले आहे
ताकात कॅलरीज कमी आणि पोषक घटकांचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे ते पचनक्रिया सुधारण्यास मदत करुन खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासही उपयुक्त ठरते
ताक शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते, त्यातील प्रोबायोटिक्स आणि कॅल्शियम फॅटी लिव्हरमधील चरबी कमी करण्यास मदत करु शकते