Anuradha Vipat
एका महिन्यात जिममध्ये न जाता किंवा कोणत्याही कृत्रिम सप्लीमेंट्सशिवाय घरच्या घरी शरीर सुदृढ आणि पिळदार बनवणे शक्य आहे.
३० दिवसांत शरीरात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी खालील गोष्टींचे तंतोतंत पालन करा.
छाती, खांदे आणि हातांचे स्नायू बळकट करण्यासाठी रोज ३० ते ५० पुश-अप्स मारा.
पायांचे स्नायू मजबूत करण्यासाठी आणि शरीराचा खालचा भाग सुडौल करण्यासाठी रोज ५० स्क्वॉट्स करा.
पोटाचे स्नायू कडक करण्यासाठी आणि कोर स्ट्रेंथ वाढवण्यासाठी रोज २ मिनिटे प्लँक करा.
शरीराची लवचिकता आणि ताकद वाढवण्यासाठी रोज सकाळी १२ ते १५ सूर्यनमस्कार घाला.
स्नायूंच्या वाढीसाठी रोजच्या आहारात मोड आलेली कडधान्ये, डाळी, अंडी, पनीर, दही किंवा सोयाबीनचा वापर वाढवा.