Team Agrowon
उन्हाळ्यामध्ये वातावरणातील उष्णता वाढल्याने जनावरांच्या शरिराचे तापमानही वाढत असते.
हे वाढलेलं तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी शरिरातील उष्णता, शरिरक्रियेचा वेग वाढवून शरीराबाहेर टाकावी लागते, त्यामुळे शरीर क्रियांवर ताण पडतो. त्याचा परिणाम म्हणून तापमान नियंत्रणासाठी जनावरे पाणी अधिक पितात व चारा किंवा खाद्य कमी खात असतात.
म्हशींचा निसर्गतःच रंग हा काळा असतो आणि कातडीसुद्धा जाड असते.
गायीपेक्षा म्हशींमध्ये घामग्रंथीची संख्या कमी असते. त्यामुळे म्हशींमध्ये घामावाटे फारशी उष्णता बाहेर पडत नाही.
तापलेल्या शरीराचे तापमान कमी करण्यासाठी किंवा शरीर थंड ठेवण्यासाठी म्हशी डबक्यात जाऊन बसतात.
ज्याठिकाणी डबके किंवा मोकळ्या पाण्याची सोय नाही अशा ठिकाणी गोठ्यात फॉगर्स व फॅन बसवून तापमान कमी करण्याचा प्रयत्न करावा.
जनावरांना खाद्यातून अ- जीवनसत्वाचा पुरवठा करण्यासाठी जास्तीत जास्त हिरवा चारा दयावा. यासाठी इतर ऋतुत हिरवा चारा मुबलक असताना त्याचा मुरघास बनवावा.