Anuradha Vipat
कमी बजेटमध्ये स्टायलिश आणि महागडा लुक मिळवण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्याची गरज नसते.
फक्त काही स्मार्ट फॅशन हॅक्स वापरून तुम्ही अतिशय आकर्षक दिसू शकता.
तुमच्या कपाटात पांढरा शर्ट, काळा टी-शर्ट, चांगली फिटिंग असलेली ब्लू जीन्स आणि एक काळी कुर्ती यांसारखे बेसिक कपडे नक्की ठेवा.
हे बेसिक कपडे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे मिक्स करून नवीन लुक तयार करू शकता.
बजेटमधील कपडे खरेदी करा आणि ते परफेक्ट फिट करून घ्या. योग्य फिटिंगमुळे साधा कपडाही महागडा दिसतो.
एकाच साध्या ड्रेसवर किंवा कुर्तीवर चांदीचे मोठे झुमके, एखादी सुंदर स्कार्फ किंवा स्टायलिश बेल्ट वापरा.