Mahesh Gaikwad
ब्रिस्क वॉक म्हणजे वेगाने चालणे. ब्रिस्क वॉक हा एक शारिरीक व्यायामाचाच एक प्रकार आहे.
व्यायामाच्या या प्रकारामध्ये चालता-चालता तुम्ही चालण्याची गती वाढविता आणि अधित वेगाने चालता.
ब्रिस्क वॉकिंग आरोग्यासाठी विविध प्रकारे फायदेशीर आहे. याचा आपल्या दैनंदिन आरोग्याच्या समस्यांपासून आराम मिळण्यासाठी खूप फायदा होतो.
ब्रिक्स वॉकिंगमुळे वाढलेले वजन कमी होण्यास होते. पोटावरची चरबी कमी होते.
ब्रिस्क वॉकिंगमुळे हृदयाचे आरोग्या सुधारण्यास मदत होते. तसेच हृदयविकार होण्याची शक्यता कमी होते.
सकाळी मोकळ्या हवेत चालण्याचा शरीर आणि मनावर सकारात्मक परिणाम होतो. परिणामी तुम्ही दिवसभर उर्जावान आणि फ्रेश राहता.
तसेच ब्रिस्क वॉकिंगमुळे मानसिक ताण कमी होतो. यामुळे तुमचे मानसिक आरोग्य निरोगी राहते.
ब्रिस्क वॉकिंगमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि आजार होण्याचा धोका कमी होतो. दररोज ब्रिस्क वॉकिंग केल्यामुळे आरोग्यात सकारात्मक बदल दिसतात.