Anuradha Vipat
सकाळची घाई असो वा ऑफिसवरून आल्यानंतरचा थकवा, अनेकदा स्वयंपाकाचा प्रचंड कंटाळा येतो.
अशा वेळी काही स्मार्ट किचन हॅक्स वापरल्यास स्वयंपाक काही मिनिटांत आणि अगदी हसत-खेळत पूर्ण होऊ शकतो.
आठवड्याच्या सुरुवातीलाच किंवा आदल्या रात्री पूर्ण मेनू ठरवून ठेवा. यामुळे स्वयंपाकघरात उभे राहिल्यावर वेळेची बचत होते.
शनिवार-रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी आठवड्याभराचा लसूण सोला, आले-लसणाची पेस्ट बनवा, कोथिंबीर साफ करा आणि वाटण तयार करून फ्रिजमध्ये एअर-टाईट डब्यात ठेवा.
ज्या दिवशी खूप थकवा किंवा आळस असेल, त्या दिवशी खिचडी, बिर्याणी, पुलाव, पास्ता किंवा डाळ-ढोकळी यांसारखे वन-पॉट मील बनवा.
रोज पीठ मळण्याचा कंटाळा येत असल्यास, २ ते ३ दिवसांचे पीठ एकदम मळून फाईल किंवा एअर-टाईट डब्यात थोडे तेल लावून फ्रिजमध्ये ठेवा.
चना, राजमा, छोले किंवा मूग-मटकी एकत्र उकडून त्याचे लहान-लहान पोर्शन करून डीप फ्रीझरमध्ये ठेवा.