Team Agrowon
देशातील कापूस उत्पादकांना दिलासा देण्यासाठी केंद्राने ५ वर्षांसाठी कापूस उत्पादकता मिशनची (मिशन फाॅर काॅटन प्रोडक्टीव्हीटी) घोषणा केली आहे.
या मिशनअंतर्गत शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी अद्यावत तंत्रज्ञान पुरवले जाणार आहे. तसेच अतिरिक्त लांब धागाचे वाण शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी केली.
जगातील महत्वाच्या अमेरिका, ब्राझील, ऑस्ट्रेलिया, इजिप्त या देशांच्या कापूस उत्पादकतेपेक्षा भारतातील कापूस उत्पादकता खूपच कमी आहे. या देशातील शेतकऱ्यांना तेथील सरकारे अद्यवात बियाणे आणि तंत्रज्ञान पुरवते.
उत्पादकता कमी असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ उताराचा मोठा फटका देशातील कापूस उत्पादकांना बसत असतो.
शेतकरी मागील अनेक वर्षांपासून देशातच अतिरिस्त लांब धाग्याच्या बियाणे आणि तंत्रज्ञान पुरवण्याची मागणी करत आहेत. देशातच या कापसाचे उत्पादन झाल्यास आयात कमी होईल.
अर्थमंत्र्यांनी आता अतिरिक्त लांब धाग्याच्या कारसाचे वाण शेतकऱ्यांना देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे देशातील शेतकऱ्यांना या कापसाच्या उत्पादनातून चांगला भाव मिळेल आणि आयातही कमी होईल.
कापूस उत्पादकता मिशन (मिशन फाॅर काॅटन प्रोडक्टीव्हीटी) ५ वर्षांसाठी असेल. या मिशनमधून कापसाची उत्पादकता वाढीवर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. तसेच शाश्वत कापूस उत्पादनासाठी काम केले जाणार आहे.
तसेच अतिरिक्त लांब धाग्याच्या कापसाचे वाण शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. कापूस उत्पादकांना अद्यावत तंत्रज्ञान पुरवले जाणार आहे.
कापूस उद्योगासाठी ५ एफ धोरण राबविले जाणार आहे. या धोरणाच्या माध्यमातून देशातील कापड उद्योगाला गुणवत्तापूर्ण कापसाचा सुरळीत पुरवठा करण्यावर जोर दिला जाणार आहे.