Anuradha Vipat
अंबाडीची भाजी ही चवीला आंबट आणि गुणांनी अत्यंत पौष्टिक मानली जाते.
या पालेभाजीत भरपूर प्रमाणात लोह, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन्स असतात, जे शरीराला अनेक आजारांपासून दूर ठेवतात.
अंबाडीच्या भाजीमध्ये लोह आणि फॉलिक ॲसिड अत्यंत उच्च प्रमाणात असते. याच्या नियमित सेवनाने शरीरात नवीन रक्तपेशी तयार होतात, हिमोग्लोबिनची पातळी वाढते.
या भाजीमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियमचा मोठा साठा असतो. हे सर्व घटक हाडांची घनता वाढवतात
अंबाडीच्या भाजीला येणारा आंबटपणा हा त्यातील व्हिटॅमिन सी मुळे असतो. व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स शरीराला फ्लू, सर्दी-खोकला आणि इतर संसर्गजन्य आजारांपासून वाचवतात.
जर तुम्हाला भूक न लागण्याचा किंवा अपचनाचा त्रास असेल, तर अंबाडीची भाजी पाचक रसांना उत्तेजित करते.
अंबाडीच्या पानांतील पोटॅशियम शरीरातील सोडियमची पातळी संतुलित राखून रक्तवाहिन्यांवरील ताण कमी करते, ज्यामुळे हाय ब्लड प्रेशर नियंत्रित राहण्यास मदत होते.