Ayurvedic Herbs : रोजच्या आहारात ठेवा 'या' ५ आयुर्वेदिक जडीबुटी; नेहमी राहाल निरोगी!

Anuradha Vipat

प्रतिकारशक्ती

रोजच्या आहारात आयुर्वेदिक जडीबुटींचा समावेश केल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते, पचनक्रिया सुधारते आणि मानसिक ताण कमी होतो.

Ayurvedic Herbs | Agrowon

औषधासारखे काम

आयुर्वेदानुसार, आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असणारे मसाले आणि वनस्पती औषधासारखे काम करतात.

Ayurvedic Herbs | agrowon

हळद

हळदीमध्ये 'कर्क्युमिन' नावाचे तत्व असते, जे अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सिडेंट गुणांनी समृद्ध आहे. हे सांधेदुखी कमी करण्यास, त्वचा सुधारण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते.

Ayurvedic Herbs | Agrowon

आले किंवा सुंठ

आल्याला आयुर्वेदात उत्तम पाचक मानले गेले आहे. हे पोटफुगी, गॅस, अपचन आणि मळमळ होणे यांसारख्या समस्या दूर करते. तसेच हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात सर्दी-खोकल्यापासून आराम देते

Ayurvedic Herbs | Agrowon

तुळस

तुळशी मानसिक ताण आणि चिंता कमी करते. यामध्ये अँटी-व्हायरल गुणधर्म असतात, जे श्वसनसंस्थेचे आजार दूर ठेवतात.

Ayurvedic Herbs | Agrowon

आवळा

आवळा हा व्हिटॅमिन-सीचा सर्वात मोठा नैसर्गिक स्त्रोत आहे. हे शरीरातील त्रिदोष संतुलित ठेवते.

Ayurvedic Herbs | Agrowon

अश्वगंधा

अश्वगंधा शरीराला ऊर्जा आणि ताकद देणारी वनस्पती आहे. यामुळे शरीरातील थकवा दूर होतो, रात्री शांत झोप लागते आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.

Ayurvedic Herbs | agrowon

Increase Stamina In Women : महिलांनो! दिवसभर काम करून थकवा जाणवतो? आजच आहारात सुरू करा 'हे' सुपरफूड्स

Increase Stamina In Women | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...