Increase Stamina In Women : महिलांनो! दिवसभर काम करून थकवा जाणवतो? आजच आहारात सुरू करा 'हे' सुपरफूड्स

Anuradha Vipat

शारीरिक आणि मानसिक थकवा

आजकालच्या धावपळीच्या युगात घर, कुटुंब आणि करिअर अशा सर्व जबाबदाऱ्या सांभाळताना महिलांना अनेकदा शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवतो.

Increase Stamina In Women | Agrowon

पोषणयुक्त घटक

शरीरातील ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी आणि स्टॅमिना वाढवण्यासाठी केवळ जास्त खाणे महत्त्वाचे नसून आहारात पोषणयुक्त घटकांचा समावेश करणे आवश्यक आहे.

Increase Stamina In Women | Agrowon

मोड आलेली कडधान्ये आणि डाळी

मोड आलेल्या मटकी, मूग किंवा हरभऱ्यामध्ये भरपूर प्रथिने, फायबर आणि जीवनसत्त्वे असतात. हे पदार्थ शरीराला हळूहळू आणि दीर्घकाळ ऊर्जा देतात.

Increase Stamina In Women | Agrowon

केळी

दिवसातून १ किंवा २ केळी खाल्ल्याने शरीरातील ऊर्जेची पातळी झपाट्याने वाढते.

Increase Stamina In Women | Agrowon

हिरव्या पालेभाज्या

भारतीय महिलांमध्ये लोहाची कमतरता खूप जास्त आढळते. लोह शरीरातील ऑक्सिजनचे वहन सुधारते, ज्यामुळे शारीरिक क्षमता आणि स्टॅमिना वाढतो.

Increase Stamina In Women | Agrowon

सुकामेवा आणि बिया

बदाम, अक्रोड, अंजीरासोबतच भोपळ्याच्या बिया आणि अळशी महिलांसाठी उत्तम आहेत. यामध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिड, निरोगी फॅट्स आणि प्रोटीन असतात.

Increase Stamina In Women | Agrowon

नाचणी

नाचणीमध्ये दुधापेक्षा जास्त कॅल्शियम आणि भरपूर कार्बोहायड्रेट्स असतात. जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवून शरीराला सतत ऊर्जा पुरवत राहते.

Increase Stamina In Women | Agrowon

Prevent Premature Graying : कमी वयात केस पांढरे होतायत? केमिकल डाय ऐवजी वापरा 'हे' नैसर्गिक तोडगे

Prevent Premature Graying | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...