Deepak Bhandigare
शेंगदाणे खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते
विशेषतः उकडलेले शेंगदाणे (भुईमूग) हे प्रथिने, विविध जीवनसत्त्वे आणि खनिजांचा उत्तम स्रोत आहे
शेंगदाण्यांमध्ये असलेली पोषकद्रव्ये एकूणच आरोग्य चांगले राहण्यास महत्त्वाची भूमिका बजावतात
शेंगदाण्यांमधील हेल्दी फॅट्स हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त मानले जातात
यामुळे खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत मदत होऊन हृदयविकारांचा धोका कमी होतो
शेंगदाण्यांत अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, ते ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यास मदत करत असल्याचे तज्ज्ञ सांगतात
शेंगदाण्यांतील प्रथिने आणि तंतुमय घटकांमुळे पोट बराच वेळ भरलेले राहते आणि यामुळे वजन नियंत्रणात राहते
शेंगदाण्यांमधील फायबर घटकामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते