Anuradha Vipat
शरीरातील विषारी घट बाहेर काढण्यासाठी आणि शरीर नैसर्गिकरीत्या स्वच्छ करण्यासाठी खालील काही सोपे घरगुती उपाय अतिशय प्रभावी ठरतात.
सकाळी रिकाम्या पोटी एका ग्लास कोमट पाण्यात अर्ध्या लिंबाचा रस टाकून प्या.
दिवसभरात किमान ३ ते ४ लिटर पाणी प्या. पाणी शरीरातील विषारी घटक लघवी आणि घामावाटे बाहेर काढण्यास मदत करते.
ताकामध्ये जिरे पूड आणि थोडे सैंधव मीठ टाकून प्यायल्याने पोटातील उष्णता कमी होते.
आल्याचा छोटा तुकडा पाण्यात उकळून त्यात थोडा गूळ घालून प्यायल्याने विषारी घटक बाहेर पडतात.
सफरचंद, पपई आणि हिरव्या पालेभाज्या नैसर्गिक डिटॉक्स एजंट म्हणून काम करतात .
रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासोबत एक चमचा त्रिफळा चूर्ण घेतल्याने पोट साफ होते.