Anuradha Vipat
लहान मुलांच्या पोटात जंत होणे ही एक सामान्य समस्या आहे.
जर तुमच्या बाळाच्या वर्तनात किंवा आरोग्यात खालील बदल दिसत असतील तर ते पोटात जंत असल्याचे संकेत असू शकतात.
बाळाला वारंवार गुदद्वाराच्या ठिकाणी खाज सुटते. जंत रात्रीच्या वेळी अंडी घालण्यासाठी त्या ठिकाणी येतात ज्यामुळे बाळाला अस्वस्थ वाटते.
पोटात जंत असल्यास गॅस होणे किंवा पोट फुगल्यासारखे वाटणे अशी लक्षणे दिसतात.
काही वेळा बाळ खूप जास्त खाते पण तरीही त्याचे वजन वाढत नाही कारण जंत अन्नातील पोषक तत्वे शोषून घेतात
जर तुमचे बाळ रात्री झोपेत दात कडकड वाजवत असेल तर हे जंत असण्याचे एक प्रमुख लक्षण मानले जाते.
बाळाच्या तोंडातून जास्त प्रमाणात लाळ गळत असेल तर ते जंत असल्याचे लक्षण असू शकते.