Anuradha Vipat
ज्या पेशींमध्ये एच आणि ए अँटीजेन्ससारखे विशेष रक्तगट अँटीजेन्स असतात त्या उष्णतेला अधिक प्रतिकार दर्शवू शकतात.
तज्ज्ञांच्या मते ‘O’रक्तगटाच्या लोकांमध्ये अॅड्रेनालिन हार्मोनचे प्रमाण जास्त असते.
अॅड्रेनालिन हार्मोनमुळे जेव्हा जास्त ताण किंवा शारीरिक श्रम असतात तेव्हा हृदयाचे ठोके तसेच शरीराचे तापमान वाढू शकते आणि शरीर जास्त उष्णता निर्माण करू शकते.
AB आणि B रक्तगट असलेल्या लोकांमध्ये रक्ताभिसरण आणि रोगप्रतिकारक शक्ती थोडी चांगली असते ज्यामुळे त्यांना गरमी थोडी सहन होते.
O गट असलेल्या लोकांमध्ये हार्ट अटॅक आणि रक्ताच्या गाठी होण्याचा धोका थोडा कमी असतो.
A आणि AB गट असलेल्या लोकांमध्ये काही प्रकारचे कॅन्सर, जसं की गॅस्ट्रिक किंवा पॅन्क्रियाटिक कॅन्सर होण्याची शक्यता थोडी जास्त असते.
उष्णता कमी करण्यासाठी शरीर थंड राहणे, पुरेसे पाणी पिणे आणि थेट सूर्यप्रकाश टाळणे महत्वाचे आहे.