sandeep Shirguppe
भारतीय स्वयंपाकघरात नेहमीच शिजवला जाणारा गरमागरम भात हा आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
तांदूळ शिजवून झाल्यानंतर जेव्हा भात काढून घेतला जातो, तेव्हा त्यामधील पाणी फेकून न देता ते पिण्यासाठी वापरावे.
पाणी प्यायल्यामुळे आपल्या शरिराला भरपूर ऊर्जा मिळते. कारण, या पाण्यात कार्बोहायड्रेट्सचे विपुल प्रमाण आढळून येते.
शरीराचे डिहायड्रेशन टाळण्यासाठी तुम्ही तांदळाच्या पाण्याची मदत घेऊ शकता.
अनेक उपाय करूनही जर तुमचा रक्तदाब नियंत्रणात येत नसेल तर, तुम्ही तांदळाचे पाणी पिणे फायद्याचे ठरू शकते.
तांदळाचे पाणी पिण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला यासाठी घेऊ शकता.
कर्बोदकांनी समृद्ध असलेले हे तांदळाचे पाणी प्यायल्यामुळे तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले राहते.
वजन कमी करायचे तर तांदळाच्या पाण्याचे जरूर सेवन करावे. नियमितपणे हे पाणी प्यायल्यामुळे, तुमचे वजन घटू शकते.