Anuradha Vipat
ब्लड कॅन्सर म्हणजेच रक्ताचा कर्करोग हा एक गंभीर आजार आहे. शरीरातील रक्तपेशींच्या असामान्य वाढीमुळे ब्लड कॅन्सर होतो.
ब्लड कॅन्सरची सुरुवातीच्या टप्प्यात लक्षणे ओळखल्यास त्यावर वेळीच उपचार करणे शक्य होते.
कोणत्याही कामाशिवाय किंवा कमी काम करूनही सतत थकवा जाणवणे
शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे वारंवार सर्दी, ताप, घसा खवखवणे किंवा इतर इन्फेक्शन्स होतात.
आहार किंवा व्यायामात कोणताही बदल न करता अचानक वजन कमी होणे
त्वचेवर निळे किंवा जांभळे डाग दिसणे, हिरड्यांमधून किंवा नाकातून रक्त येणे.
हाडांमध्ये किंवा सांध्यांमध्ये सतत किंवा तीव्र वेदना होणे