Anuradha Vipat
पोटफुगी होण्यामागे अनेकदा आपल्या दैनंदिन चुकीच्या सवयी आणि आहार पद्धती कारणीभूत असतात.
आहार आणि चुकीच्या सवयींमुळे पचनक्रियेत अडथळे येतात आणि गॅसची समस्या वाढते.
जेव्हा आपण अन्न घाईघाईने खातो किंवा नीट न चघळता गिळतो तेव्हा अन्नासोबत जास्त हवा पोटात जाते.
जेवताना सतत बोलल्याने देखील अन्नासोबत अतिरिक्त हवा पोटात जाते ज्यामुळे पोट फुगते.
सतत फास्ट फूड, जंक फूड, आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे. ते पदार्थ पचायला जड असतात.
आहारात हिरव्या भाज्या, फळे आणि कडधान्ये यांसारखे फायबरयुक्त पदार्थ कमी असल्यास बद्धकोष्ठतेची समस्या होते.
जेवण झाल्यावर लगेच झोपल्याने किंवा बसून राहिल्याने पचनक्रिया मंदावते.