Black Raisins : काळ्या मनुक्याचे माहिती नसलेले फायदे जाणून घ्या

sandeep Shirguppe

काळे मनुके

काळ्या द्राक्षांबरोबर काळे मनुके उपाशी पोटी नियमित खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Black Raisins | agrowon

पोषक घटक

काळ्या मनुकात एन्थोकाइनिन्स, पॉलीफेनॉल, गामा-लिनोलेनिक एसिड, फॉस्फरस असे अनेक पोषकघटक असतात.

Black Raisins | agrowon

हिमोग्लोबिन व रक्त वाढवते

काळ्या मनुक्यात लोह व इतर जीवनसत्वे मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते.

Black Raisins | agrowon

डोळ्यांचे आरोग्य

काळ्या मनुक्यामध्ये डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असणारे Lutein आणि Zeaxanthin हे घटक असतात.

Black Raisins | agrowon

डायबेटीससाठी योग्य

काळ्या मनुकातील Pterostilbene हा घटक डायबेटीसमध्ये उपयुक्त ठरतो. यामुळे रक्तातील साखर आटोक्यात राहण्यास मदत होते.

Black Raisins | agrowon

अशक्तपणा दूर होतो

व्हिटॅमिन-C, व्हिटॅमिन-K, व्हिटॅमिन-A, विविध मिनरल्स यासारखे अनेक पोषकघटक असल्याने रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

Black Raisins | agrowon

पित्त कमी करते

काळ्या मनुक्याचा पित्त कमी होण्यास मदत होते. ऍसिडिटी किंवा आम्लपित्ताचा त्रास असल्यास दररोज सकाळी भिजलेले काळे मनुका खाणे उपयुक्त ठरते.

Black Raisins | agrowon

काळे मनुके कसे खावे..?

१० ते १२ काळ्या मनुका वाटीभर पाण्यात भिजत घालून दुसऱ्या दिवशी सकाळी भिजलेले मनुका उपाशीपोटी खावे.

Black Raisins | agrowon