Anuradha Vipat
कारल्याची भाजी ही आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते पण कारल्याची भाजी कडू होणे ही अनेक गृहिणींची समस्या असते.
काही सोप्या टिप्स आणि युक्त्या वापरल्यास कारल्याचा कडूपणा सहज कमी करता येतो आणि भाजी चविष्ट बनवता येते.
कापलेल्या कारल्यांवर मीठ लावून साधारण अर्धा तास ठेवा. यामुळे कारल्यातील कडू रस बाहेर पडण्यास मदत होते.
कारले कापल्यानंतर ते चिंचेच्या कोळ आणि पाण्याच्या द्रावणात अर्धा तास भिजवून ठेवा.
कडूपणा कमी करण्यासाठी कारले नारळाच्या पाण्यात काही वेळ भिजवून ठेवा.
कारल्याचा कडूपणा त्याच्या बियांमध्ये जास्त असतो. त्यामुळे बिया आणि सालीचा काही भाग काढून टाका.
कारले चिरल्यानंतर त्यावर लिंबाचा रस लावून व्यवस्थित मिक्स करा.