Shripatrao Bondre: धान्याचा भीमपराक्रम, ‘सिओ 671 शाहू’ उसाचे वाण विकसित करणारे, २५ वर्ष आमदार राहीलेले श्रीपतराव बोंद्रे

Aslam Abdul Shanedivan

श्रीपतराव शंकरराव बोंद्रे (दादा)

सहकार क्षेत्रातील जाणकार, सामाजिक जाणीव असणारे काँग्रेसचे एक प्रभावशाली नेते अशी ओळख श्रीपतराव शंकरराव बोंद्रे म्हणजेच दादा यांची होती.

Shripatrao Bondre | agrowon

जन्म आणि शिक्षण

दादांचा जन्म हा 28 डिसेंबर, 1920 रोजी झाला तर दादांनी 30 सप्टेंबर 2000 रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला. श्रीपतराव यांनी 1939 साली धारवाड बोर्डाची व्हर्नाक्युलर फायनल अर्थात सातवीची परीक्षा पास केली.

Shripatrao Bondre | agrowon

दु:खाचा डोंगर आणि लग्न

1931 साली वडील शंकरराव आणि आजी भागिरथीबाई यांचे निधन झाल्याने त्यांनी नॅशनल बँकेत भिशी गोळा करण्याचे काम केले. त्यानंतर 1941 साली २१ व्या वर्षी त्यांनी आनंदीबाई यांच्याशी विवाह केला.

Shripatrao Bondre | agrowon

धाडसी निर्णय ते भीमपराक्रम

दादांनी पंचगंगा नदीचे पाणी शिंगणापूर जॅकवेलच्या माध्यमातून फुलेवाडीपर्यंत नेले. दरम्यान दत्त मंदिराची उभारणी शालिनी पॅलेस परिसरात केली. 1977 साली 40 गुंठे रानातून 58 क्विंटल धान्याचे उत्पादन घेऊन राष्ट्रीय स्तरावर लौकिक मिळविण्याचा भीमपराक्रम केला. त्यांनी उसाची ‘सिओ 671 शाहू’ हे वाण विकसित केले.

Shripatrao Bondre | agrowon

शिक्षण संस्थांचे जाळे

श्री शाहू शिक्षण संस्थेच्या आवारात सुरू केले. यामध्ये साई हायस्कूल, श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय, वेणूताई चव्हाण मेडिकल कॉलेज, वसंतराव नाईक बी.एड्. कॉलेज, सावित्रीबाई फुले मुलींचे बी.एड्. कॉलेज, फार्मसी कॉलेज, आय.टी.आय. सुरू केले.

Shripatrao Bondre | agrowon

कृषी राज्यमंत्री

1967 साली यशवंतराव चव्हाण यांच्या सुचनेनुसार विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे गेले. त्यांनी दोन वेळा करवीर व तीन वेळा सांगरूळ विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्त्व केले. तर 1978 सालच्या शरद पवार यांच्या पुलोद आघाडी सरकारमध्ये कृषी राज्यमंत्री म्हणून काम केले.

Shripatrao Bondre | agrowon

राजकारण आणि समाजकारण

आपल्या मंत्रीपदाच्या काळात यांनी दीर्घकाळ राजकारण आणि समाजकारण केले. तर शेती, शेतकरी, कष्टकरी, कामगार, बेरोजगार अशा जनतेच्या अनेक प्रश्‍नांना विधानसभेत वाचा फोडली.

Shripatrao Bondre | agrowon

Nilgiri Oil Benefits : आयुर्वेदात सर्वात प्रभावी निलगिरी तेलाचे फायदे