Swarali Pawar
बाजारात आंबा दिसायला सुंदर असतो, पण आतून नेहमीच गोड असेल असं नाही. काही सोप्या टिप्स वापरल्या तर तुम्ही सहज योग्य आंबा निवडू शकता.
आंब्याचे खांदे उंच आणि देठ थोडा आत गेलेला असावा. याचा अर्थ आंबा पूर्ण वाढलेला आणि पिकायला तयार आहे.
आकाराच्या तुलनेत जड वाटणारा आंबा निवडा. जड आंबा म्हणजे आतून रसाळ आणि गोड असतो.
देठाजवळ हलका गोड वास येत असेल तर आंबा चांगला आहे. उग्र किंवा आंबूस वास येत असेल तर तो आंबा टाळा.
आंब्याची साल स्वच्छ आणि कमी डागांची असावी. जास्त काळे डाग, जखमा किंवा सुरकुत्या असलेला आंबा घेऊ नका.
आंब्यावर लहान छिद्र दिसले तर तो घेऊ नका. अशा छिद्रांमधून आत किड असण्याची शक्यता असते.
आंबा हलक्या दाबाने थोडा मऊ वाटला पाहिजे. खूप कडक किंवा खूप मऊ आंबा टाळावा.
उंच खांदे, गोड वास आणि जड वजन हाच परफेक्ट आंबा. फक्त रंगावर नाही, तर स्पर्श आणि वासावर विश्वास ठेवा.