Bhokar Tree : दुर्मीळ होत चाललेली भोकर वनस्पती एवढी उपयोगाची

Team Agrowon

भोकर हा वृक्ष उंचावरील प्रदेश आणि समशीतोष्ण हवामान वगळता संपूर्ण भारतात आढळून येतो.

Bhokar Tree | Agrowon

हा वृक्ष झपाट्याने वाढणारा असून पानझडी प्रकारातील आहे. भोकराचे झाड पाच ते सात मीटर उंच व एक खोड पद्धतीने वाढते.

Bhokar Tree | Agrowon

डेरेदारपणामुळे याचा वापर शोभिवंत वृक्ष म्हणून केला जातो.

Bhokar Tree | Agrowon

लाकडाचा उपयोग सजावटीचे फर्निचर तयार करण्यासाठी होतो.

Bhokar Tree | Agrowon

पानांचा वापर चारा म्हणून केला जातो. याची कच्ची फळे मुख्यतः भाजी व लोणचे करण्याकरिता वापरली जातात.

Bhokar Tree | Agrowon

पक्व फळे आकाराने स्थानिक बोराएवढी, बेचव, चिकट व फिक्कट गुलाबी रंगाची असतात.

Bhokar Tree | Agrowon

Bhokar Treeफळे अँटिऑक्सिडंट्सचे समृद्ध स्रोत मानली जातात. फळे सेवनामुळे पचनसंस्था सुधारते, पोटातील कृमींचा नाश होतो, केसांचे आरोग्य सुधारते.

Bhokar Tree | Agrowon

Goat Farming : अशी घ्या व्यायलेल्या शेळीची काळजी