Anuradha Vipat
भाऊबीजेच्या निमित्ताने तुमच्या लाडक्या भाऊरायाला प्रेम आणि आपुलकीने भरलेले शुभेच्छा संदेश नक्की पाठवा.
आम्ही दिलेले हे संदेश तुमच्या बहिण भावाच्या नात्यातील गोडवा आणखी वाढवतील
माझ्या सुखात आणि दुःखात नेहमी माझ्यासोबत राहणाऱ्या माझ्या लाडक्या भावा, तुला भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा!
भाऊबीजेच्या या पवित्र दिवशी, माझ्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी आयुष्यासाठी परमेश्वराला प्रार्थना करते.
सोनियाच्या ताटी, उजळल्या ज्योती, ओवाळीते भाऊराया रे, वेड्या बहिणीची रे वेडी माया! भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
बहिणीची असते भावावर अतूट माया, मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया. भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
ही भाऊबीज आपलं नातं अधिक मजबूत करो आणि आयुष्यात आनंद आणि समृद्धी आणो. भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा!