Anuradha Vipat
दिवाळीत घरात तयार होणाऱ्या गोड पदार्थांपैकी बालुशाही हा एक महत्त्वाचा पदार्थ आहे.
आज आपण बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ, रसाने भरलेली बालुशाही घरच्या घरी सोप्या पद्धतीने कशी बनवायची हे पाहणार आहोत.
मैदा - २ कप, तूप - १/४ कप, दही - १/४ कप, बेकिंग सोडा - १/४ चमचा, पाणी, तळण्यासाठी तेल.
साखर - १ १/२ कप, पाणी - १/२ कप, वेलची पूड - १/२ चमचा, केशर - चिमूटभर.
मैदा चाळून घ्या त्यात बेकिंग सोडा घाला. तूप आणि दही घालून हाताने मिश्रण चांगले चोळून घ्या. थोडं थोडं पाणी घालून कणिक हलक्या हाताने मळून घ्या. कणिक १०-१५ मिनिटांसाठी झाकून ठेवा.
पिठाचे लहान लहान गोळे करून गोळ्याला मधोमध छिद्र पाडा. तेल गरम करा आणि त्यात तयार केलेले गोळे मंद आचेवर सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
तळलेले बालुशाही गरम पाकात बुडवा आणि काही वेळ पाकात राहू द्या. बाहेर काढल्यानंतर त्यावर बदामाचे काप किंवा पिस्त्याचे काप घालून सर्व्ह करा.