Anuradha Vipat
महाराष्ट्राला संतांची भूमी म्हटले जाते. धावपळीच्या जीवनातून थोडा ब्रेक घेण्यासाठी तुम्ही पवित्र तीर्थक्षेत्रांना नक्की भेट देऊ शकता.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठुरायाच्या चरणी गेल्यास एक वेगळीच शांतता मिळते.
'सबका मालिक एक' असा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या दरबारात जगभरातून भक्त येतात.
निसर्ग आणि भक्तीचा संगम पाहायचा असेल तर गणपतीपुळे सर्वोत्तम आहे. समुद्रकिनाऱ्यावर वसलेले हे स्वयंभू गणपतीचे मंदिर आहे.
शिस्त आणि स्वच्छतेसाठी शेगावचे मंदिर जगप्रसिद्ध आहे. येथील आनंद सागर परिसरही पाहण्यासारखा आहे.
भारतातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी ५ महाराष्ट्रात आहेत. महादेवाची भक्ती करणाऱ्यांसाठी ही ठिकाणे ऊर्जास्त्रोत आहेत.
संत ज्ञानेश्वर माउलींची संजीवन समाधी (आळंदी) आणि संत तुकाराम महाराजांची जन्मभूमी (देहू) ही दोन्ही ठिकाणे इंद्रायणी नदीच्या काठी वसलेली आहेत.