Anuradha Vipat
मधुमेह झाल्यावर अनेकांचा असा समज होतो की जमिनीखाली वाढणारी सर्वच कंदमुळे खाणे पूर्णपणे बंद करावे लागते.
प्रत्येक कंदमुळाचा ग्लायसेमिक इंडेक्स आणि त्यातील कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण वेगवेगळे असते.
योग्य कंदमुळांची निवड केल्यास रक्तातील साखर नियंत्रणात राहून शरीराला आवश्यक पोषक तत्त्वे मिळू शकतात.
मुळ्याचा ग्लायसेमिक इंडेक्स अत्यंत कमी असतो आणि त्यात पाण्याचे व फायबरचे प्रमाण भरपूर असते. जेवणात सॅलड म्हणून कच्चा मुळा खाल्ल्याने रक्तातील साखर झपाट्याने वाढत नाही.
कच्च्या गाजराचा ग्लायसेमिक इंडेक्स खूपच कमी असतो. गाजरातील फायबर आणि बीटा-कॅरोटीन साखरेचे शोषण संथ करतात आणि इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारण्यास मदत करतात.
ही औषधी कंदमुळे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी उत्तम मानली जातात. आलं आणि लसणामुळे इन्सुलिन संवेदनशीलता वाढते आणि शरीरातील दाह कमी होतो.
बीटचा ग्लायसेमिक इंडेक्स मध्यम असला तरी त्यातील एकूण साखरेचे प्रमाण कमी असते. त्यामुळे रसाऐवजी कच्च्या बीटचे २ ते ३ तुकडे सॅलडमध्ये खाणे फायदेशीर ठरते.