Team Agrowon
गुलाबी थंडी आणि आल्हाददायक वातावरणामुळे हिवाळा हा महाराष्ट्रातील निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो.
थंड हवेच्या हिल स्टेशन्सपासून ते स्वच्छ समुद्रकिनारे आणि जंगल सफारीपर्यंत, यंदाच्या हिवाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रातील 'ही' अप्रतिम ठिकाणे तुमच्या ट्रिपसाठी नक्की निवडू शकता.
नंदनवन म्हणून ओळखले जाणारे महाबळेश्वर हिवाळ्यात पर्यटकांचे सर्वात आवडते ठिकाण असते.
निसर्गाच्या सान्निध्यात शांत वेळ घालवण्यासाठी भंडारदरा उत्तम पर्याय आहे. आर्थर लेक, रंधा धबधबा, कळसूबाई शिखर आणि रात्रीच्या वेळी तलावकाठी कॅम्पिंग व काजव्यांचे दर्शन हा एक अद्भुत अनुभव असतो.
पुणे आणि मुंबईकरांसाठी वीकेंड ट्रिपसाठी लोणावळा-खंडाळा नेहमीच पसंतीस उतरते. हिवाळ्यातील गार वारे, टायगर पॉइंट, भुशी डॅम परिसर आणि गरमागरम चिक्की व मक्याच्या कणसांची मजा येथे घेता येते.
विदर्भाचे नंदनवन असलेले चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण हिवाळ्यात अत्यंत आल्हाददायक असते.
ज्यांना कडाक्याच्या थंडीऐवजी आल्हाददायक समुद्रकिनारा आवडतो, त्यांच्यासाठी हिवाळा हा कोकणात जाण्याचा सर्वोत्तम काळ आहे.